- आत्मविश्वास ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
- श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा.
- आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व स्वर्गाहून अधिक आहे.
- माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू : आळस, अज्ञान व अंधश्रद्धा.
- जगात दुस-याला हसण्याइतके सोपे व दुस-यासाठी रडण्याइतके कठीण काम नाही.
- तुम्ही प्रयत्नकरते व्हा, झटा, झगडा, मात्र निराश होऊ नका यश तुमच्या आटोक्यात येईल.
- आयुष्य ही चैन नसून ते एक कर्तव्य आहे.
- उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते.
- शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे.
- चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण.
- नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
- शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय.
- बालमनाची काळी प्रेमाच्या फुकाराने फुलवीत असतात तेच गुरु.
- विद्यार्थ्यांना सर्वसाधारण आचारसंहिता
- मी स्वत:ची कामे स्वत: करीन.
- मी ठरलेल्या वेळेनुसार शाळेत येईन.
- मी सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करीन.
- मी सर्वांशी आदरभावाने वागेन.
- मी सर्व व्यसनांपासून जाणीवपूर्वक दूर राहीन.
- मी माझ्या धर्माप्रमाणे अन्य धर्मावरही प्रेम करीन.
- मी समाजहिताला बाधक अशा सामाजिक रूढीना थारा देणार नाही.
- मी आई वडील, बहिण, भाऊ यांना कामात मदत करीन.
- मी विशिष्ट कामे पुरुषांची व विशिष्ट कामे स्त्रियांची असा फरक नं करता सर्व कामे करीन.
- मी जातीच्या किंवा रंगाच्या कसोटीवर कोणाचाही भेदभाव करणार नाही.
- मी कोणत्याही निरपराध प्राण्याची हत्या करणार नाही.
- मी कोणत्याही हिंसात्मक कृत्यात , अथवा कोणत्याही मोडतोडीत भाग घेणार नाही, नीच मानणार नाही.
- मी कोणतेही काम कमी प्रतीचे न मानता ते आस्थेने करेन.
- मी देशास स्वतंत्र व वैभव करून देणा-या क्षेत्रातील व्यक्तीबद्दल आदर बाळगीन.
Tuesday, 22 March 2016
सुविचार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment