ज्ञानमाता आदिवासी हायस्कूल उपलाट-पाटीलपाडा च्या शैक्षणिक साईट (ब्लॉग) वर आपले सहर्ष स्वागत..!

Sunday, 24 July 2016

Varsha Marathon 2016

Saturday, Date: 23/07/2016. Gnanmata HighSchool Students Participated in Varsha Marathon Competition- 2016 | 3km, 5km & 7km.




Tuesday, 21 June 2016

21 st Jun - International Yoga Day




21 जून- आंतरराष्ट्रीय योग दिन- योग दिन साजरा करताना 
ज्ञानमाता हायस्कूल चे विद्यार्थी



Sunday, 5 June 2016

SSC Results 2016


6 जून 2016 रोजी दुपारी 1.00 वाजता

Tuesday, 24 May 2016

HSC Result 2016-Maharashtra State Board

HSC Result 2016 will be on 25th May 2016 at 1.00 PM

Monday, 23 May 2016

New blog about ICT

New blog coming soon about ICT & GK


Online at ICT

Thursday, 21 April 2016

Saturday, 26 March 2016

Happy Easter



HAVE A BLESSED EASTER

Wednesday, 23 March 2016

वर्तमानपत्र

वर्तमान पत्रे- ताज्या बातम्यांसाठी खाली दिलेल्या वर्तमानपात्रांवर क्लिक करा.
  1. सकाळ
  2. लोकसत्ता
  3. लोकमत
  4. पुढारी
  5. महाराष्ट्र टाईम्स
  6. सामना
  7. तरुण-भारत
  8. दिव्य मराठी

Tuesday, 22 March 2016

विद्यार्थ्यांसाठी

सुविचार

  1. आत्मविश्वास ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. 
  2. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. 
  3. आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व स्वर्गाहून अधिक आहे. 
  4. माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू : आळस, अज्ञान व अंधश्रद्धा. 
  5. जगात दुस-याला हसण्याइतके सोपे व दुस-यासाठी रडण्याइतके कठीण काम नाही. 
  6. तुम्ही प्रयत्नकरते व्हा, झटा, झगडा, मात्र निराश होऊ नका यश तुमच्या आटोक्यात येईल. 
  7. आयुष्य ही चैन नसून ते एक कर्तव्य आहे. 
  8. उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते. 
  9. शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे. 
  10. चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण. 
  11. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. 
  12. शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय. 
  13. बालमनाची काळी प्रेमाच्या फुकाराने फुलवीत असतात तेच गुरु. 
  14. विद्यार्थ्यांना सर्वसाधारण आचारसंहिता 
  15. मी स्वत:ची कामे स्वत: करीन. 
  16. मी ठरलेल्या वेळेनुसार शाळेत येईन. 
  17. मी सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करीन. 
  18. मी सर्वांशी आदरभावाने वागेन. 
  19. मी सर्व व्यसनांपासून जाणीवपूर्वक दूर राहीन. 
  20. मी माझ्या धर्माप्रमाणे अन्य धर्मावरही प्रेम करीन. 
  21. मी समाजहिताला बाधक अशा सामाजिक रूढीना थारा देणार नाही. 
  22. मी आई वडील, बहिण, भाऊ यांना कामात मदत करीन. 
  23. मी विशिष्ट कामे पुरुषांची व विशिष्ट कामे स्त्रियांची असा फरक नं करता सर्व कामे करीन. 
  24. मी जातीच्या किंवा रंगाच्या कसोटीवर कोणाचाही भेदभाव करणार नाही. 
  25. मी कोणत्याही निरपराध प्राण्याची हत्या करणार नाही. 
  26. मी कोणत्याही हिंसात्मक कृत्यात , अथवा कोणत्याही मोडतोडीत भाग घेणार नाही, नीच मानणार नाही. 
  27. मी कोणतेही काम कमी प्रतीचे न मानता ते आस्थेने करेन. 
  28. मी देशास स्वतंत्र व वैभव करून देणा-या क्षेत्रातील व्यक्तीबद्दल आदर बाळगीन.

Monday, 21 March 2016

Sunday, 20 March 2016

ई-बुक लायब्ररी


ई-बुक लायब्रर

ई-बालभारती या साईट वरुन इ. 1 ली ते इ. 8 वी ची सर्व पाठ्यपुस्तके  विविध भाषांमधून PDF स्वरूपातून ओनलाइन  डाऊनलोड करता येतात.
वर्ग, माध्यम, विषय, आणि पुस्तकांचा प्रकार इ. निवडून झाल्यावर हवे ते पुस्तक डाउनलोड करू शकतात. खालील लिंक वर क्लिक करा. 

संत-थोर-महापुरुष

संत -अधिक माहितीसाठी खालील नावांवर क्लिक करावे.


5. पैगंबर                         6. संत एकनाथ                7. संत तुकाराम               8. संत मीराबाई
9. संत जनाबाई               10. मुक्ताबाई                  11. संत नामदेव              12. गुरुनानक
13. तुकडोजी महाराज      14. महावीर                     15. गोरा कुंभार               16. निवृत्तिनाथ
17. सावता माळी             18.                                 19.                                20.

थोरांच्या  जीवनपटासाठी खालील नावांवर क्लिक करावे.

1. छत्रपती शिवाजी महाराज                                      2. सानेगुरुजी
5. महात्मा जोतीराव फुले                                          6. महात्मा गांधी
7. सावित्रीबाई फुले                                                   8. राणी लक्ष्मीबाई
9. लोकमान्य टिळक                                               10. राजर्षी शाहू महाराज
11. नेताजी सुभाषचंद्र बोस                                       12. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
13. क्रांतिसिंह नाना पाटील                                      14. यशवंतराव चव्हाण
15. कर्मवीर भाऊराव पाटील                                     16. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम 

Tuesday, 8 March 2016

जागतिक महिला दिन


जागतिक महिला दिन- 8 मार्च
जागतिक महिला दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!
       भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता सर्व स्तरावर तसेच बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.
      संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
माहिती स्त्रोत(विकिपीडिया) अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Monday, 29 February 2016

Best of Luck

इ.10 वी (SSC) परीक्षा मार्च- 2016

दहावीच्या सर्व विद्यार्थ्याना बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.

------------------------Best Of Luck------------------------


SSC परीक्षा केंद्र -ज्ञानमाता आदिवासी हायस्कूल उपलाट